-->
MY SCHOOL
ZPPS MAKTA CRC.BHANGARAM TALODHI BRC.GONDPIPARI ZP.CHANDRAPUR
नमस्कार
HERE YOU WILL GET TO READ & WATCH LEARNING EXPERIENCES FROM MY CLASSROOM WITH THEIR EXPECTED OUTCOMES...ALSO YOU WILL GET EDUCATIONAL CONTENT IN THE FORM OF PDF BOOKS,PPTX FILES,VIDEOS,AUDIOS.. etc.

Friday, August 25, 2017

शाळा सुरू झाल्यापासून इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी  शिकणे सातत्याने सुरू आहे.
त्यासाठी त्यांना मी पुढीलप्रमाणे मदत केली.
१.सुरुवातीचे काही दिवस या छोट्या दोस्ताना चित्रकार्ड, प्रत्यक्ष वस्तू दाखवून तसेच संगणकावर चित्रे दाखवून "What picture is this ? व "What's this ?" हे प्रश्न विचारून अपेक्षित उत्तरे मिळवली...कधी कधी ते काही चित्रांतील वस्तूंसाठी त्यांना  इंग्रजी प्रतिशब्द माहित नसल्याने मराठी शब्द उत्तरादाखल सांगत...त्यावेळी संबंधित चित्रातील वस्तूंसाठी मी स्वतः त्यांना इंग्रजी शब्द सांगायचो..
असा सराव दिल्याने आज माझ्या या चिमुरड्यांना शाळापरिसरातील बहुतांश घटकांची इंग्रजी नावे ज्ञात झालेली आहेत..दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे.

२.त्यांनंतरचे काहीदिवस Alphabet chart च्या मदतीने अक्षर-चित्र संगतीने सर्व alphabets चे प्रकट वाचन करून घेतले...संगणक/प्रोजेक्टरच्या मदतीने Alphabet songs दाखवले-ऐकवले...यातून  सर्व  Alphabets (capital व small letters) ची ओळख त्यांना झाली.

३.शब्दवाचनपूर्वतयारीसाठी प्रत्येक alphabets चे ध्वनी (phonic sounds) समजून घेणे महत्वाचे म्हणून youtube वरील निवडक phonic songs ची मदत घेतली.
त्यानंतर परत एकदा alphabet chart वरील सर्व alphabets चे त्यांच्या phonic sounds सह प्रकटवाचन घेतले.
विद्यार्थ्यांनी ध्वनी आत्मसात केलेत वा नाही याची पडताळणी करण्यासाठी "What does 'A,B,C,D......X,Y,Z say ? असा प्रश्न विचारून अपेक्षित प्रतिसाद मिळवला.

४.Alphabets व त्यांचे Phonics त्यांनी आत्मसात केल्याची पूर्ण खात्री झाल्यानंतर आज प्रत्यक्ष शब्द वाचनाकडे मोर्चा वळवला आणि अपेक्षित प्रतिसाद मिळण्यास सुरूवातदेखील झालीय...त्याचा हा recorded video रुपी नमुना इथे share करतोय.




माझी शाळा- जि.प.प्राथ.शाळा भानुसेवस्ती टाकळी जि. ता.सिल्लोड जि.औरंगाबाद.
W3Schools

No comments:

Post a Comment

आपला अभिप्राय लिहा...